▪️बोर्डा गावातील भूमी फार्महाऊस मधील जुगार अड्यावर रामनगर पोलीसांचा छापा..
▪️जुगार खेळणारे व खेळविणा-या फार्महाऊस चालकासह १६ लोकांवर गुन्हा दाखल. एकूण ४७,६४,०९०/- रुपयाचा मालमुद्दा जप्त..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत भूमी रेस्टहाऊस, बोर्डा मध्ये काही लोक अवैद्यरित्या हारजित चा जुगार खेळत व खेळवीत असल्याची गोपनीय माहिती वरून मा. श्री. प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम पोलीस स्टेशन रामनगर व शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा नियोजन करून बोर्डा गावातील भूमी फार्महाऊसवर दि. १५/०८/२०२६ रोजी १७/०० वा. छापा घातला असता तेथे जुगार खेळणारे व खेळविणारे एकूण १५ लोक व जुगार अड्डा चालविणारा हॉटेल चालक शामराव व्यंकटेश आनंदवार, रा. हनुमान नगर, तुकुम, चंद्रपूर हे मिळून आल्याने त्यांचेवर छापा कारवाई करून त्यांचे कब्जातून जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम व जुगार खेळण्यासाठी येण्याची व तेथून जाण्याची साधने असा एकूण ४७,६४,०९०/- रू. चा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याबाबबत त्यांचेवर पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. १०१४/२०२६ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर काककडे यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे नेतृत्वात रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, स.पो.नि. हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मिलींद दोडके, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे, ब्ल्युटी साखरे, सुरज शेडमाके, मंगेश शेंडे, कुमोद खनके, संदिप भोयर, संजू देशीवाले, संदेश चुनारकर, सतिष डांगे, राकेश पिंपळकर, यांनी केली आहे.



