आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ग्रामसभा रस्त्यावरच! जाफराबाद ग्रामपंचायतीच्या नियोजनावर ग्रामस्थांचा संताप..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : जाफराबाद, ता. सिरोंचा : जाफराबाद ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज आयोजित करण्यात आली; मात्र ग्रामसभेसाठी आलेल्या ग्रामस्थांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने अनेक ग्रामस्थ अक्षरशः रस्त्यावर उभे राहून ग्रामसभेत सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गावाच्या विकासाचे प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि महत्त्वाचे ठराव यावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा ही अत्यंत महत्त्वाची लोकशाही प्रक्रिया आहे. मात्र ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या बैठकीसाठीच ग्रामस्थांना रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येत असेल, तर ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

ग्रामसभा घेणे एवढेच प्रशासनाचे काम आहे का? ग्रामस्थांना बसण्याची साधी व्यवस्था करणेही शक्य नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामसभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असताना आवश्यक जागा, बैठक व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ग्रामस्थांना रस्त्यावर उभे राहावे लागल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे ग्रामसभेत गावातील रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, विकासकामे, निधीचा वापर आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असते. अशा वेळी ग्रामस्थांचा सन्मान राखून ग्रामसभा घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही का? असा सवालही उपस्थित होत आहे.

या प्रकाराची ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात ग्रामसभा योग्य नियोजनासह आणि ग्रामस्थांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेऊन आयोजित करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

रस्त्यावर उभे राहून ग्रामसभा—ही जाफराबादच्या ग्रामस्थांची मजबुरी की ग्रामपंचायतीच्या नियोजनाचा अभाव? याचे उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाने देणे गरजेचे आहे.

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवनाथ
प्

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.