आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️पत्रकार महेंद्र कोवले यांना उत्कृष्ट लेखन पुरस्कार

🔷एन. डी. हॉटेल चंद्रपूर येथे महा. राज्य ग्रामीण पत्रकार संघाकडून सन्मान

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही 🙁 इंडिया २४ न्यूज ) पत्रकार महेंद्र कोवले यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीसह सामाजिक प्रश्नावरील निर्भिड मांडणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने त्यांना “उत्कृष्ट लेखन पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

चंद्रपूर येथील एन. डी. A हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. कोवले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. तसेच ग्रामीण भागातील विविध समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सामाजिक, शैक्षणिक तसेच सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना आपल्या प्रभावी लेखणीतून वाचा फोडणारे, कोवले हे दैनिक नवजीवनचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरास्तरीय मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला, पुरुष, विद्यार्थी व पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गजानन वाघमारे व पदाधिकारी उपस्थित होते.

सत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महेंद्र कोवले यांच्या सन्मानाबद्दल सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.