▪️”स्वतंत्र मजदूर युनियनची” आढावा बैठक उत्साहात संपन्न..!
▪️ चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे चंद्रपूर जिल्हा कार्यकारी घोषित..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्वतंत्र मजदूर युनियन (रजि. क्र. एनजीपी–४७५७) जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हा कार्यकारिणी तसेच संलग्न संघटनांची आढावा बैठक शनिवार दिनांक 26 सप्टेंबर 2026 रोजी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन, वरोरा नाका, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली.
सदर बैठकीस स्वतंत्र मजदुर युनियन चे राज्य सरचिटणीस मा. गणेश उके साहेब यांची अध्यक्ष म्हणून तसेच स्वतंत्र समता शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा. सुनिल तेलतुंबडे साहेब, यांची प्रमुख उपस्थिती व मुख्य मार्गदर्शक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. तुळशीराम जांभुळकर साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, तथा मुख्य संपादक : जागृती हेच ध्येय, माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना., मा. पाटील सर,झोनल सचिव चंद्रपूर गडचिरोली जिल्हा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन महाराष्ट्र राज्य व मा.सौ. सुरेखाताई अथरगडे मॅडम, स्वतंत्र अंगणवाडी कर्मचारी संघटन महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक तसेच राज्याध्यक्ष राजकुमार चिकटे सर स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटन महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला सूत्रसंचालन श्री. राजेंद्र गेडाम सर सचिव स्वतंत्र मजदूर युनियन चंद्रपूर जिल्हा यांनी काम पाहिले. या बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर, संघटनात्मक बाबींवर तसेच आगामी काळातील उपक्रम आणि नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध मुद्दे मांडले.
कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविणे, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आणि आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीला अधिक गती देणे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या आढावा बैठकीमुळे जिल्ह्यातील कामगार संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
“स्वतंत्र मजदूर युनियन” हे भारतातील महामानवांच्या विचारधारेतील एकमेव ट्रेड युनियन असून याचे नेतृत्व माननीय जे. एस. पाटील साहेब करीत आहेत.
स्वतंत्र मजदूर युनियन च्या वतीने आजपर्यंत देशात व राज्यात अनेक आंदोलने करण्यात आली मग रामलीला मैदान दिल्ली असो की जंतर-मंतर वरील धरणा कार्यक्रम असो की
अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मोर्चा आंदोलने असो याचं समर्थपणे नेतृत्व स्वतंत्र मजदूर युनियन ने केलेले आहे.
आज देशपातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन सोबत भारतातील ७२संघटनाअसंघटित व संघटित क्षेत्रातील संलग्नित आहेत.या युनियन कडे स्वतःचं ट्रेनिंग सेंटर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे आहे तसेच स्वतःचे ऑफिस हजारी पहाड नागपूर व नीलकमल कॉम्प्लेक्स महाजन मार्केट नागपूर येथे आहे.येथून भारतभर पत्रव्यवहार होत असतात.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले,राजर्षी शाहूजी महाराज ,रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पेरियार रामास्वामी नायकर या महापुरुषांच्या विचारधारेवर या संघटनेचे कार्यअविरतपणे सुरू आहे .स्वतंत्र मजदूर युनियन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आवाहन करते की, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतंत्र मजदूर युनियन ला अधिक मजबूत व बळकट करावे.
हेडलाईनसाठी पर्याय:
“स्वतंत्र मजदूर युनियनची आढावा बैठक; कामगारांच्या प्रश्नांवर मंथन!”



