आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️शिवटेकडी झाली प्लास्टिकमुक्त! वनविभागाच्या स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

▪️वन्यजिव सप्ताहानिमित्त नवरगाव परीसरात स्वच्छता अभियान ; प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावत धार्मिक स्थळाचा परिसर केला चकाचक

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही 🙂इंडिया २४ न्यूज )
सिंदेवाही वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपक्षेत्रातील प्रसिद्ध शिवटेकडी परिसरात वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वाब फाउंडेशन आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत परिसरातील मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक कचरा हटविण्यात आला.

वनविभागाच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून शिवटेकडी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. नवरगाव परिसरातील हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने तेथे भाविक तसेच पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे परिसरात जमा होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, जेवणानंतर फेकण्यात आलेल्या प्लास्टिक पत्रावळ्या, ग्लास, वाट्या आदी कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

स्वच्छता पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी करून ठिकठिकाणी पडलेला प्लास्टिक कचरा गोळा केला. संकलीत कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याने शिव टेकडी परिसर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमातून धार्मिक व पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

या स्वच्छता अभियानात स्वाब संस्थेचे स्वच्छता मित्र यश कायरकर, जीवेश सयाम, शरद गभणे, जीवन गुरूनुले, नितीन भेंडाळे, गणेश गुरनुले, गणेश गावतुरे, गिरधर निकुरे, शुभम निकेश्वर, सुमित गुरनुले, यांच्यासह वन विभागाचे नवरगाव वनक्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले.

यावेळी क्षेत्र सहाय्यक आर. आर. सिडाम, वनरक्षक कु. प्राजक्ता चौधरी, कु. एम. बि. सुरपाम, ओ.व्ही. चाहांदे, एस. एन. नागरे तसेच वनुमजूर उपस्थित होते.

वन्यजीवाचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी स्वच्छ परिसर हीच पहिली पायरी असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.