आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️नेमडा शाळेची जीर्ण इमारत धोकादायक, विद्यार्थ्यांना झाडाखाली शिक्षण..!

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत जप्राबाद अंतर्गत नेमडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जीर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. शाळेचे छत जीर्ण झाले असून अनेक ठिकाणी प्लास्टर निघाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळेची इमारत धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. उन्हात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ न करता प्रशासनाने तातडीने शाळेची पाहणी करून नवीन व सुरक्षित शाळा इमारत मंजूर करून बांधकाम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.



