▪️”मिशन स्वराज्य क्रांती” आघाडी स्वबळावर मूल नगर परिषद निवडणूक पूर्ण पॅनल ताकदीने लढवणार..
▪️राष्ट्रीय समाज पक्ष व युवक आघाडी मूल यांचा आघाडीस पाठिंबा..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मिशन स्वराज्य क्रांती आघाडी ही मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर पूर्ण पॅनल ताकदीने लढवणार असून तशी तयारी केलेली आहे.
वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भूमिपुत्र ब्रिगेड, विषमता निर्मूलन दल, भारतीय समाज पार्टी, युवक आघाडी व अल्पसंख्यांक सेल या सर्व छत्रपती शिवाजी महाराज, म. ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतिविर बाबुराव शेडमाके, विर बिरसा मुंडा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास घेऊन चालणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन “मिशन स्वराज्य क्रांती “ही सर्व समवेशक वैचारिक पॅनल तयार केली असून मूल शहराच्या सर्वांगीन विकासासाठी होऊ घातलेली मूल नगर परिषद निवडणूक पूर्ण पॅनलनिशी ताकदीने लढणार आहे.मूल शहरात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. मूल शहरातील रस्ते, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि शहराचे सौंदर्यकरण,अपुरा पाणी पुरवठा, ढेपाळलेली राहदारी, इ. समस्या चे निवारण करण्यासाठी ही आपली सर्वांची “मिशन स्वराज्य क्रांती “आघाडी आपणा सर्वांना घेऊन निवडणूकीच्या रणांगणात पूर्ण ताकदीने उतरणार आहे.
असे मत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष ऍड. रितेश मारकवार तसेच श्री. दिलीपजी गेडाम आणि आघाडीचे इतर पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे.



