▪️सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाजोन्नती मंडळ सफाळे कडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
पालघर – ( इंडिया 24 न्युज ) : रविवार दि. 13 जुलै रोजी पालघर तालुक्यातील सफाळे येथील ग्रामदेवता कुर्लाई मंदिराच्या परिसरामध्ये सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समजोन्नती मंडळाकडून वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी विविध जातीची फुलझाडे लावण्यात आली.
सदर प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविका करून वृक्षारोपन का केले पाहिजे या विषयी माहिती दिली. या वेळी वृक्षदाते अनंत जीवन पाटील यांनी वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मोफत वृक्ष उपलब्ध करून दिली व आपल्या मनोगता मधून वृक्ष कमी झाल्याने पर्यावरणावार काय परिणाम होत आहे त्या साठी प्रत्येक माणसानी काय केले पाहिजे यासंबंधी सविस्तर माहिती दिली. तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष शेलार सर यांनी सुद्धा अनेक दाखले देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी मंडळाचे विश्वस्त व संपूर्ण कार्यकारणी समाज बांधव तसेच ग्रामदेवता कुर्लाई मंदिर सफाळेचे ट्रस्टी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवाकर पाटील यांनी केले.