आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️वेटलिफ्टिंग विभागीय स्पर्धेत तेजस्विनी चौखुंडे प्रथम..

▪️नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचं नेतृत्व करणार..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : वर्धा जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे दिनांक १९सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवभारत विद्यालय, मूल येथील विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी नरेश चौखुंडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत ५३ किलो गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

या यशामुळे तेजस्विनी ची निवड येत्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली असून, ही स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत तेजस्विनी नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तेजस्विनी च्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर आणि शारीरिक शिक्षक गुरुदास चौधरी तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.