▪️भेंडाळा येथे आधार केंद्र सुरू करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्यूज ) : नागरिकांना विविध शासकीय तसेच निमशासकीय कामाकरिता आधारकार्डची अत्यंत आवश्यकता आहे. वेळोवेळी निरनिराळ्या कामासाठी आधारकार्ड लिंक करावा लागतो. लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केलेली आहे. त्यामुळे अनेक महिलांना आपला आधारकार्ड बँक खात्याशी जोडावे लागत आहे. मात्र,भेंडाळा परिसरात आधार केंद्र सहा महिन्यापासून बंद असल्याने लाडक्या बहिणींना तसेच नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.केवळ चामोर्शीच्या पंचायत समितीमध्ये आधार केंद्र सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे. नागरिक व लाडक्या बहिणींच्या सोयीसाठी भेंडाळा येथे आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी राहुल वैरागडे, विलास चिचघरे, हेमंत कोवासे यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.या समस्येकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.



