आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ SAM-1 अखेर जेरबंद..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार वावर करून मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 यास दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. सदर जेरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. Tiger SAM-1
यापूर्वी, दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतकाम करत असताना अमोल बबन नन्नवारे वय -37 वर्षे रा. भामडेळी यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीच्या आधारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी करून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून सदर वाघास जेरबंद करून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.