*मुलचेरा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची जोरदार मोर्चेबांधणी*
*मूलचेरा शिवसेना तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या नेतृत्वात हरिनगर येथे शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश*

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
*हिंदूह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व.आनंद दिघे यांच्या विचारांचा व सेवेचा वारसा जपत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुलचेरा तालुक्यातील हरीनगर येथे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. मुलचेरा तालुक्यात एकेकाळी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मर्यादित होती. मात्र 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणाचा धागा कायम ठेवत गोरगरिबांच्या समस्या पोटतिडकीने मांडणारे व त्या समस्या, प्रश्न सोडविणारे नेतृत्व गौरव बाला यांच्या रूपाने तालुक्यात उदयाला आले आणि मूलचेरा तालुक्यात शिवसेनेची घोडदौड सुरु झाली.व मुलचेरा नगरपंचायतीवर शिवसेनेने सत्ता काबीज केली. आता येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूकीत पक्षाला यश प्राप्त करून देण्याचा दृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे धोरण अवलंबिण्यात येत असून हरीनगर येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. व शिवसेनेचा दुपट्टा हाती घेत तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा दुपट्टा टाकत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पंकज कर्माकर, ट्रफी मंडल तरूण बैरागी समिर मंडल, अनंत मंडल अमृत गोलदार, सुकदेव बैरागी, तुषार बैरागी, मुकुल कर्माकर आनंद समद्दर, अभिषेक गाईन, सुब्रत हलसुजित जोददार देवकुमार शाना, अर्जुन शाना सत्याजित गाईन महेश रॉय, विश्वजित मंडल, अनुप विश्वास, जयदेव बेपारी, यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे मुलचेरा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे चित्र आहे*

