ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विधानमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश..

▪️न. प. माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ शेकडो कार्यकर्ते प्रवेश..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : घोटाळे करणाऱ्यांना हाताशी धरुन सत्तेवर बसणाऱ्या भाजपला खाली खेचण्यासाठी मतभेद बाजूला ठेवले तर काँग्रेसच सत्तेवर येईल.

वोट चोरी करून सत्तेवर बसलेल्या सरकारला गरिबांशी व शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नसून स्वार्थीपणा जोपासत राज्याला कंगाल करून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून ठेवले आहे.अशा खोटारड्या भाजप नेत्यांना खाली खेचण्यासाठी आपले मतभेद विसरून एकदिलाने काम केले तर काँग्रेसच सत्तेवर येईल. असे आवाहन माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

मूल तालुका व शहर काॅंग्रेस कमेटीच्या वतीने आयोजीत कार्यकर्ता आढावा बैठक आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम प्रसंगी आ. विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, प्रदेश सरचिटणीस तथा जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक विलास मोगरकर, बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, महिला काॅंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे,माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार, माजी जी.प. सदस्या मंगला आत्राम, माजी प.सं.सभापती वैशाली पुल्लावार, पोंभुर्णा तालुकाध्यक्ष वासुदेव पाल,बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, जिल्हा काँग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर, सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार,राजू पाटील मारकवार, महीला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार यांचेसह काॅंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी,सरपंच,सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.

शेतकरी संकटात असताना सहकार्य न करता महायुती मधील काही महाभाग शेतक-यांना शत्रु समजून चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान करून धार्मिक आणि जातीयवादाला रंग देण्याचा अशोभनिय प्रकार करीत असल्याचा आरोप करतांना आ.विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचा त्याग करून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या प्रशांत समर्थ आणि त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन केले. माजी आमदार देवराव भांडेकर यांनी मी काँग्रेसच्या पाठीशी आहे असे सांगितले. सभापती राकेश रत्नावार यांनीही विचार व्यक्त केले. तर प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना गोर गरीब जनतेचे कामे होत नाही, त्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, म्हणून स्थानिक भाजपामधील गटबाजी काॅंग्रेससाठी लाभदायी राहणार असून सर्व नेते व कार्यकर्ते मिळून प्रचार करावे अशी कार्यकर्त्यांना विनंती केली. भाजप नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळेच मी व माझे कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे मत प्रशांत समर्थ यांनी व्यक्त केले.

कार्यकर्ता आढावा बैठकीच्या निमित्याने मूल नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा दरार युवक व दुर्गा मंडळाचे निर्माते,भाजपा कार्यकर्ते प्रशांत समर्थ, दरार महिला मंडळाच्या अध्यक्ष एकता समर्थ, भाजपा कार्यकर्ते राहुल येनप्रेड्डीवार, संतोष ठाकुरवार, रितीक गोयल, स्वप्नील श्रीरामे, प्रविण खानोरकर, सुनिल महाडोळे, दिनेश लेनगुरे, धर्मा चौधरी, सोनी ठाकुरवार, प्रणाली येनप्रेड्डीवार, संगीता मोहुर्ले, मनिषा ठाकुरवार, आकाश इन्नमवार, गौरव बावणकर, अरविंद पोहणे यांचेसह दिडशेच्या वर भाजपा व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ. विजय वडेड्डीवार यांचे उपस्थितीत स्थानिक काॅंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच पोभुर्णा तालुक्यातील आपचे जिल्हा युवा अध्यक्ष मनीष राऊत यांचेसह भाजपाचे सर्व सोसायटीचे अध्यक्ष व अनेक पदाधिकारी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी प्रास्ताविक केले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी संचलन आणि महीला अध्यक्ष नलीनी आडपवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहर व ग्रामीण काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिला व नागरीक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.