विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ ( नियोजित ) म्हडा वसाहत शिरढोण येते वसाहत स्वच्छता अभियान व एकतास श्रमदान हा उपक्रम राबवण्यात आला…

सुबोध सावंत :- मुंबई विभागीय प्रतिनिधी
शिरढोण :(इंडिया 24 न्यूज ) ठाणे जिल्ह्यातील व कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण येते
श्रमदान’ म्हणजे समाजाच्या
कल्याणासाठी शारीरिक श्रमाचे ऐच्छिक योगदान होय. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शारीरिक कामासाठी स्वेच्छेने काम करणे समाविष्ट आहे, जसे की रस्ते दुरुस्त करणे, स्वच्छता राखणे, वृक्षारोपण करणे किंवा इतर सामाजिक सेवा. हे एक सामाजिक कार्य आहे ज्यातून समाजसेवा आणि एकत्र काम करण्याची भावना वाढते.
अर्थ: ‘श्रम’ म्हणजे कष्ट आणि ‘दान’ म्हणजे देणे. त्यामुळे, ‘श्रमदान’ म्हणजे कष्टाचे दान करणे.

उद्देश: समाजाच्या विकासासाठी आणि भल्यासाठी लोकांना एकत्र आणून शारीरिक श्रमाच्या माध्यमातून काम करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हाच उद्देश विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे आज रोजी दिनांक 9/11/2025 सकाळी 11 वाजता वसाहत स्वच्छता अभियान सुरू करण्यात आला. रहिवाशाने मोठा उत्साहात एकत्र येऊन वसातील साफसफाई मोठ्या जोमाने पार पाडले. बि. नंबर 1 A 1 B 1 C आणि 1 D संपूर्ण परिसर स्वच्छ करून मंडळाने समाजामधील लोकांना मोलाचा वाटा दाखवून दिला आहे हिच जागृती समाजातील लोकांना व्हावी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा ज्याने करून आपला आरोग्य निरोगी राहावे हिच या मंडळाचे जनजागृती आहे.

हा उपक्रम राबवण्यासाठी मंडळाच्या आधारस्तंभ सुबोध सावंत कार्याध्यक्ष गणेश यावलकर अध्यक्ष भगवान पोपळे, सचिव गणेश पारेकर, खजिनदार गणेश महाजन, पवन साळुंखे नानासाहेब रोकडे अजिंक्य वडगणे राऊत अण्णा रोहित कारभारी अजिंक्य टोम्पे अमोल टोम्पे फिरोज शेख यमगर गणेश वटे सोमनाथ कोल्हे शुभम पाटील अक्षय प्रजल पाटील संतोष किर्ते दत्तू महाजन महेश डोके अभिषेक मगर नितीन दुवे, बाळू यावलकर गणेश मोरे नारायण भोसले रितेश चव्हाण रुपेश चव्हाण संदीप कदम अमोल कुळवेकर उमेश खराडे प्रवीण शिंदे ओंकार भादुले संतोष रुपनर सुमित पोपळे अरविंद सिंघम दिनेश पवार तुषार कोपळे समाजसेवेला प्राधान्य देत एक आदर्श निर्माण केला आहे त्याचा हा सामाजिक जाणिवेचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.



