▪️मुल तालुक्यातील बेलगाटा येथील घटना वाघाच्या हल्ल्यात पितांबर सोयाम यांचा मृत्यू.

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मुल – ( इंडिया 24 न्युज ) : मूल तालुक्यातील बेलगाटा येथील रहिवासी पितांबर गुलाब सोयाम वय 37 वर्षे यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक सोयाम हे दिनांक 13 डिसेंबरला दुपारी गुरे चारायला जंगलात गेले होते. मात्र सायंकाळ होऊनही ते घरी परत आले नाही. कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोध मोहीम राबवली. परंतु ते आढळले नाहीत. रात्री घरी परत न आल्यामुळे त्यांनी वनविभागाला माहिती दिली.आज दिनांक 14 डिसेंबरला सकाळी गावकरी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात शोध मोहीम राबवली असता त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. यावेळी त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे निदर्शनात आले. या घटनेमुळे बेलगाटा परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. नागरिकांनी गुरे चारायला किंवा वन परिसरात जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केलेले आहे. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाने सानुग्रह मदत केली. पुढील तपास वनविभाग करीत आहे



