ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️जिमलगट्टा येथील अंगणवाडी केंद्रात अरुनोदय सिकलसेल अंनेमीया विशेष अभियान तपासणी शिबीर संपन्न..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील जिमलगट्टा अंगणवाडी क्र. १ येथे आज अरुनोदय अनेमीया विशेष तपासणी अभियान राबवण्यात आले, यावेळी वय ०ते ४०वर्ष व योगटातील महिला व पुरुष बालक, बालिका सिकलसेल तपासणी करण्यात आले आहे. या वेळी एकूण १०२ नागरिकांना तपासणी करण्यात आले आहे. या अरुनोदय सिकलसेल अनेमिया विशेष तपासणी अभियात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी सुलोचना चिलनकर, आरोग्य सहाय्यिका रजनी वासनिक, आरोग्य सेविका मखनलाल मार्गीया, आरोग्य सेविका सरीता गावडे, अंगणवाडी सेविका मंजुषा वेलादी, सरीता पानेम, सरीता डुरके, आशा वर्कर मारिका कांबडे, अंगणवाडी मदतनीस ज्योती पानेम, आदी उपस्थित होते.

