ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️लॉयड्स मेटल द्वारे आयोजीत क्रिकेट स्पर्धेत महावितरण संघ उपविजेता..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 03 फेब्रुवारी 2026:- महावितरणच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये चंद्रपूर परिमंडळाच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केलेले आहेत पण घुगुस येथील लॉयड्स मेटल लीग यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये महावितरण चंद्रपूर परिमंडळातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मिळून एक क्रिकेट संघ निर्माण केला आहे. व या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यात उपविजेते पद मिळण्याचे यश 11 जानेवारी 2026 रोजी प्राप्त केले आहे. वर्ष 2025-26 साठी लॉयड्स कप औद्योगिक स्पर्धेत एकूण 14 संघाचा समावेश होता. बाद फेरीच्या 3 सामन्यात विजय मिळवून महावितरण चंद्रपूर संघाने अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित केला. या स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या संघाला पारितोषिक वितरण एम.आय.डी.सी. चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. रुंगटा व लॉयड्स मेटल घुगुसचे मुख्याधिकारी श्री वाय. जी. एस. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.
आज दि. 03/02/2026 रोजी मा. मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ श्री. हरिश गजबे यांनी उपविजेता संघाचा सत्कार केला. यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.