▪️प्रभाग क्र. ०७ मध्ये सौं. माधुरीताई करकाडे यांच्यावर जनतेचा विश्वास – जन समर्थनात झपाट्याने वाढ..!

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्युज ) : मूल नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच प्रभाग क्रमांक ०७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदासाठी निवडणूकीच्या रणांगणात असलेल्या सौ.माधुरी महेंद्र करकाडे यांच्या नावाभोवती जोरदार चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात घराघरात, चौकाचौकात सौं. माधुरी करकाडे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या उमेदवारीचा विषय चर्चेचा ठरला आहे.
प्रभागातील वेगवेगळ्या परिसरात चालू असलेल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांकडून त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. उच्च शिक्षण घेतलेली, नम्र स्वभावाची आणि सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारी अशी सौं. माधुरी करकाडे यांची ओळख निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
“आता प्रत्येक ध्येय विकासाच गाठायचं—- प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचं” हेच ब्रीद घेऊन सौं.माधुरी करकाडे ह्या त्यांच्या विजयासाठी जनतेचा आशीर्वाद मागत आहेत.
स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले की सौं. माधुरीताई ह्या आमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात. कोणतीही अडचण आली की त्या तत्काळ मदतीस धाव घेतात. त्यांच्या रुपाने आमच्याकडे एक सक्षम महिला नेतृत्व तयार होत आहे.”
या जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सौं. माधुरी करकाडे यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून, भाजपकडून प्रभाग क्रमांक ०७ मध्ये त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
मागील पाच वर्षात मूल शहरातील रस्ते, पाणी पुरवठ्याची सोय, घंटागाडीद्वारे नियमित स्वच्छता, शहरातील नागरी सुविधा, आरोग्य शिबीरे, विविध सामाजिक उपक्रम हिच जमेची बाजू आहे.प्रभागातील मतदार विकासाच्या बाजूने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा त्यांना विश्वास आहे.
प्रभागातील अनेक कार्यकर्ते, महिला आणि युवक-युवती वर्गाने सौं. माधुरी करकाडे यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. शेकडो कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात स्वयंस्फूर्तीने उतरले असून, ह्या प्रभागात भाजपचा झेंडा सौं. माधुरी करकाडे यांच्या नेतृत्वाखाली फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. सौं. माधुरी करकाडे यांचा वाढता जनाधार, महिलांमधील प्रभाव, आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०७ मध्ये भाजपच्या विजयाचे समीकरण सौं. माधुरी करकाडे यांच्या नावाशी जोडले जात असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

