▪️न.प.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदयात्रा व नागरिकांशी संवाद..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
घुग्गुस – ( इंडिया 24 न्युज ) : शहर घुग्गुस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (दि.२७) ला घुग्गुस शहरातील मुख्य मार्गाने चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री.किशोरभाऊ जोरगेवार यांचेसह पदयात्रेत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला. घुग्गुस नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी नागरिकांच्या प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती,वीज, नवीन विकासकामांची गरज, आरोग्यविषयक अडचणी अशा अनेक मूलभूत विषयांवर विविध प्रभागातील नागरिकांशी मोकळेपणाने संवाद साधला. 
यावेळी आगामी न.प.निवडणुकीत घुग्गुस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असून भाजपच्या नगराध्यक्ष पदासह सर्वच नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करून विकासासाठी घुग्गुस नगर परिषदेवर आपण भाजपाचा झेंडा फडकवू असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी माझ्यासमवेत घुग्गुस शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, व्यापारी संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



