आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मूल नगर परिषद प्रभाग-०९ चे अपक्ष उमेदवार सतीशभाऊ आकुलवार यांची उंच भरारी..

▪️निर्भीड आवाज आणि प्रामाणिक विकास हेच ध्येय..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये जनतेच्या हितासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत असल्याची घोषणा सामाजिक कार्यात व पत्रकारितेत कार्यरत असलेले सतीश आकुलवार यांनी केली आहे. प्रभागातील रहिवाशांनी दिलेल्या आग्रहाला मान देत व त्यांच्या विश्वासाचा मान राखत ही दावेदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “प्रभागातील सर्वांगीण विकास व जनतेच्या प्रश्नांचा प्रामाणिक आवाज बनणे हाच माझा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.

▪️पत्रकारितेतून जनतेच्या प्रश्नांना वाचा..

सतीश आकुलवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून स्थानिक समस्या, नागरिकांचे प्रश्न, प्रभागातील विकासकामांची गरज आणि प्रशासनाकडे दुर्लक्ष झालेल्या मुद्द्यांना सातत्याने उजेडात आणले. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची त्यांची शैली प्रभागामध्ये विशेष लोकप्रिय आहे.

▪️सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर..

पत्रकारितेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग, गरजूंची मदत, शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत योगदान आणि युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण मतदार व विविध वस्ती भागातील नागरिकांशी त्यांचे थेट व मजबूत नाते तयार झाले आहे.

▪️”विकास हा एकमेव मुद्दा – जनतेचा विश्वास माझी ताकद”

प्रभागात मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, लाईट व्यवस्था, युवा व महिला उपक्रमांचे बळकटीकरण या महत्त्वाच्या मुद्द्यांव?

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.