चंद्रपूर नगरीमध्ये ७ वे वर्धापण दिन व महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आणि सत्कार सोहळा मोठ्या उत्सवात साजरा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर : माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना तथा यहोवा यीरे फौंडेशन व इंडिया 24 न्यूज च्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मा.सा. कन्नमवार सभागृह जिल्हा परिषद चंद्रपूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. डॉ. अविनाश सकुंडे : आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तथा अल्पसंख्यांक आयोग सदस्य भारत सरकार नवी दिल्ली हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री तुळशीराम हनुमानजी जांभुळकर सर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा मुख्य संपादक इंडिया 24 न्युज व सौ शिल्पाताई प्रफुल बनपुरकर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा तथा संपादिका, डॉ. रमेशकुमार बोरकुटे सर CEO / डायरेक्टर तथा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, डॉ. समया पशुला माजी जि. प. अध्यक्ष गडचिरोली,डॉ. डोंगरवार, श्री. प्रमोद सिंह परमार संपादक, श्री. रवि कुमार मिश्रा सर, सौ. प्रिया जांभूळकर, अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आले. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. तुळशीराम हनुमानजी जांभुळकर यांनी प्रस्तावना वाचून संघटनेची संपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सातव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती : ह. भ. प. सौ सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर भद्रावतीकर श्रीमद् भागवत कथाकार, राष्ट्रीय कीर्तनकार प्रबोधनकार अ भा श्री गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज मोझरी जिल्हा सेवाधिकारी, श्री. बंडोपंत बोढेकर ग्रामगीताचार्य : श्री गुरुदेव गुरुदेव सेवा मंडळ चंद्रपूर, श्री. प्रकाश देवगडे सर उपसंपादक : दैनिक देशोन्नती, उपस्थित होते. तसेच चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली जिल्हातील जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते
श्रीमती नीलम पोरेकर चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षा ( RTI),चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती रजनी झाडे, विदर्भ संघटक श्री. प्रफुल बनपुरकर, गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षा सौ. रूपा शहा, तसेच सिन्देवाही ता. अध्यक्ष तेजेन्द्र नागदेवते, ज्ञानेश्वर हांडेकर, संजय कोटकर वरोरा तालुका अध्यक्ष, मतीन शेख वरोरा, महादेव कोटकर वरोरा, श्री. शेखर माजगोनवार चंद्रपूर, डॉ. इस्माईल पठाण वरोरा, रंजीत मोडक चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील
सर्व तालुका पदाधिकारी व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.किशोर मुटे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष)यांनी सांभाळले वआभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाचा समारोप श्री. राजेंद्र गेडाम सर महाराष्ट्र महासाचिव यांनी केले.



