ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री डॉ.अशोक उईके

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेला न्याय देणार आहे. गत 15 वर्षापासून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शेतकरी शेतमजूर दलित, आदिवासी, दुर्बल घटक यांच्यासाठी बऱ्याच लोककल्याणकारी योजना व निधीची तरतूद करण्यात येत आहे. त्याचेच प्रतिबिंब आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सुद्धा उमटले असून देशातील सर्व जनतेला या अर्थासंकल्पामुळे दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच सामान्य नागरिकांचा विचार करून आर्थिक धोरणे राबित असल्यामुळे लोकांचे जीवनमान सुकर झाले आहे. आजच्या अर्थसंकल्पातही सामान्य माणसांचे प्रतिबिंब उमटले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी व्यक्त केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.