▪️मनरेगा कंत्राटी कर्मचान्यांच्या कामबंद आंदोलनाचा मजुरांना बसतोय फटका..
▪️मंजुरी रखडली: उपासमारीची वेळ शासन दखल घेईना..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचान्यांना शासन सेवेत नियमित अथवा समायोजित करावे व इतर प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात आदी मागण्यांना घेऊन कंत्रटी अधिकारी कर्मचारी संपावर गेले आहेत
कंत्राटी कर्मचान्यांच्या संपाने मनरेगाची घडी विस्कटली असुन कामे ठप्प पडली आहेत कामाअभावी मजुरांची कोडी होत असून उपासमारीची वेळ आली आहे
मनरेगा ही योजना प्रत्यक्षात राबविणारे कंत्रटी कर्मचारी गेल्या अनेक वर्ष पासून अत्यल्प वेतन कोणतीही सेवा सुरक्षा नसताना आणि अनिश्चत सेवा अटीमध्ये काम करत आहेत वारंवार निवेदने आंदोलनाचा इशाराआणि
लोकप्रतिनिधि मार्फत पाठपुरावा करूनही शासनाने एकही ठोस निर्णय न घेतल्याने अखेर कर्मचान्यांनी संपाची भूमिका घेतली आहे मनरेगा कंत्राटी अधिकारी कर्मचान्यांना एस _२ इन्फाॅटेक कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत व अवैधभरती प्रक्रिया तात्काळ बंद करून सदर कंपनीचा करार रद्द करावा सर्व कर्मचान्यांना राज्य निधि असोसिएशन (सोसायटी) मार्फत नियुक्ती देऊन समान काम समान वेतन धोरण लागु करणे तसेच मनरेगा विभागाची स्वंतत्र प्रशासकीय यंत्रणा व पदनिहाय आकृतिबंध तात्काळ मंजूर करावे कार्यरत कंत्राटी कर्मचान्यांना शासन सेवेत नियमित अथवा समायोजित करावे या मागण्यांन घेऊन अधिकारी कर्मचारी संपावर गेले आहेत कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांच्या संपाने ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती थांबली असून हजारो मजुरांची मजुरी रखडल्याने उपासमारीची वेळ आली आहे शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल राज्यव्यापी आंदोलन प्रशासकीय कामकाज ठप्प करीत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे
मनरेगाची कामे रखडली
संपामुळे जाॅबकार्ड नोंदी उपस्थिती नोंदी मोजमाप आॅनलाईन डेटा एन्टी मजुरी प्रस्ताव तयार करणे आदी सर्व कामे ठप्प झाली आहेत अनेक ठिकाणी काम करूनही मजुरांच्या खात्यात मजुरी जमा झालेली नाही आधीच महागाई बेरोजगारी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या मजुरांसाठीही परिस्थिति अधिक गंभीर ठरत आहे.



