ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आश्रम शाळा आहे की गुरांचा गोठा? लाहेरी आश्रमशाळेतील विद्यार्थीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

▪️पालकांचा संताप विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा आणी सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : भामरागड अतिदुर्गम व मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे मात्र आश्रमशाळेतील‌ अधिकारी कर्मचान्यांच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पाहावयास मिळाला या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवन सभागृहात मोकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याने ही आश्रमशाळा आहे की जनावरांचा गोठा? असा प्रश्न उपस्थित होत आहे
‌नुकताच २८ जानेवारी रोजी लाहेरी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील तब्बल ७२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली विषबाधित विद्याथ्यर्थ्यापैकी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी नागपुरच्या एम्स रूग्णालयात हलविण्यात आले विशेष म्हणजे लाहेरी येथील शासकिय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यत शिक्षणाची सोय असुन या शाळेत २३० ले ३०० विद्यार्थी वसतिगृहात निवासी राहुन शिक्षण घेत आहेत हा भाग पूर्णपणे दुर्गम व जंगलव्याप्त असून या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून कसोसीची प्रयत्न केले जात आहे
आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवन राहण्याची सोय उत्तम मिळावी यासाठी शासनाकडुन भरघोस निधि दिला जात आहे असे जरी असलेतरी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे या मोकाट जनावरांच्या आश्रमशाळेतील शिरकाव केल्याच्या प्रकारावरून दसुन येत लाहेरी आश्रमशाळेत भरदिवसा मोकाट जनावरे थेट विद्यार्थ्यांच्या जेवन सभागृहात ठिय्या मांडला मात्र या जनावरांना बाहेर हाकलून लावण्यात आश्रमशाळेतील अधिकारी कर्मचारी कुणीही पुढे आले नाही विशेष म्हणजे दिवसभर शिक्षक कर्मचारी कर्तव्यावर असतात असे असतानाही हा प्रकार घडत असेल तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे विषबाधा प्रकरणामुळे आश्रमशाळेतील असुविधाचा प्रकार उघडकीस येत असल्याने अधिकारी कर्मचान्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे हित जोपासत त्यांना सोयीसुविधा उपलव्ध करून द्यावें विद्यार्थ्यांच्या बाबतीत हलर्जीपणा करूं नये अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.