ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सर्च येथे लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रियेचे आयोजन..

▪️7 व 8 फेरवरीस तज्ञ डॉक्टरांच्याहस्ते होणार शस्त्रक्रिया..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : धनोरा तालुक्यातील चातगांव येथील सर्चच्या माॅ दंतेश्र्वरीदवाखान्यात ७ व ८ फेरवारी २०२६ रोजी लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय तपासण्या आयोजित करण्यात आल्या आहेत
या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते हर्निया हायडोसिल अविकसित अंडकोष शरीरावरील गाठी मूत्रमार्ग लिंगाच्या खाली उघडणे आणि लघवी थेंब थेंब येणे यांसारख्या समस्या अमस्या असलेल्या १५ वर्षाखालील मुलांवर शस्त्रक्रिया मोफत केली जाईल यासोबतच औषधे व संपूर्ण वैद्योकीय तपासण्या देखील मोफत करण्यात येतील
रुग्ण मुलांना दवाखान्यात तपासणी करून शस्त्रक्रियेची तारिख दिली जाईल तसेच रुग्ण मुलांचा एक नातेवाईक आणि
भरती रुग्ण यांच्यासठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे
अधिक महितीसाठी ९४२०७४०१९१ या क्रमांकावर संपर्क साधून सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्च रूग्णालयावतीने करण्यात आले आहे
चातगांव येथील सर्चच्या माॅ दंतेश्वरी रुग्णलयात बालकांच्या आजारावर निदान करण्यासाठी वेळोवेळी आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जात असते हे विशोष..

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.