▪️उमेद ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे महत्वपूर्ण साधन..
▪️पुंडलिक भांडेकर यांचे प्रतिपादन..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : उमेद राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविले जाणारे महत्त्वाकांक्षी ग्रामीण जीवनज्योती अभियान असून, हे अभियान ग्रामीण भागातील महिलाना स्वयंसहायता गटाद्वारे संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे कार्य करते. उमेदच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होत असून, ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे एक महत्वपूर्ण साधन आहे. असे प्रतिपादन विद्यार्थी युवक संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांनी केले क्षेत्रातील महिला ग्रामसंघाची सभा मंडळ कार्यालय कुनघाडा रै येथे नुकतीच पार पडली त्यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलले. उमेदचे संघटन प्रशिक्षक प्रमोद गोवर्धन, प्रफुल कोटांगले, कल्पना चलाख, दिलाखुश कुनघाडकर, माधुरी दुधबळे, सुषमा सातपुते, प्रतिमा भांडेकर व स्वयंसहाय्यता गटातील महिला उपस्थित होते.
उमेद संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे हाताला काम मिळून त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम ठरतात. त्यामुळे अती दुर्बल घटकांचा गरिबी निर्मूलन मार्ग मोकळा होतो. शेतीपूरक व्यवसायातही आर्थिक भर पडत असल्याने ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारून त्यांचे सक्षमीकरण होते. तसेच महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचाही त्याप्रमाणात विकास होत असतो. असे मार्गदर्शन पुंडलिक भांडेकर यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन उमेद प्रशिक्षक प्रमोद गोवर्धन यांनी केले.



