आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️“पाणी दूषित, नाली बंद, रस्ते गायब : वाघेडा ग्रामपंचायतीतील जनतेचा संताप उफाळला.. शिवसेनेचा सूरज साहा प्रशासनाला अंतिम इशारा..!

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

भद्रावती – ( इंडिया 24 न्युज ) : गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी 2023 पासून अर्धवट अवस्थेत पडून आहे व काम पूर्णपणे बंद आहे. परिणामी गावकऱ्यांना दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासोबतच नालीचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी घरात शिरते, घाणीचे साम्राज्य निर्माण होते, दुर्गंधी पसरते व डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड सारख्या आजारांचा धोका वाढतो. तसेच रस्त्यांचा अभाव असल्यामुळे दररोज वाहनचालक, शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका व शेतकरी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गंभीर प्रश्नांबाबत आज शिवसेनेच्या वतीने गटविकास अधिकारी भद्रावती यांना निवेदन देण्यात आले असून 15 दिवसांच्या आत समस्यांचे निवारण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने पाणीटाकीचे काम पूर्ण करून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच नाली व रस्त्यांची व्यवस्था करावी, हीच नागरिकांची व शिवसेनेची ठाम मागणी आहे.
अन्यथा याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. यावेळी शिवसैनिक सुरजभाऊ शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, साहिल कसारे, कदिर खान पठाण, गणेश कचाटे, रीतिक रोडे, गौरव काकडे, प्रदीप काकडे, सतीश कुथे, धीरज बावणे, शामराव काकडे, आनंदराव कुथे, विनोद कुथे, मृणाल कुथे व समस्त गावकरी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.