▪️जप्राबाद ग्रामपंचायत वार्ड क्रमांक १ मधील समस्यांची पाहणी : रवि बारसागंडी यांची नागरिकांशी संवाद साधत दखल..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील ग्रामपंचायत जप्राबाद अंतर्गत वार्ड क्रमांक १ मध्ये अनेक मूलभूत समस्या गंभीर स्वरूपात समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाकापचे सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी संबंधित भागाला भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची दयनीय अवस्था, तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निदर्शनास आले.
रवि बारसागंडी यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व संबंधित प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी केली. तसेच, लवकरात लवकर या प्रश्नांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पाणी, रस्ते व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



