ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️रंगय्यापल्ली येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १ मध्ये शौचालयाच्या अत्यंत खराब स्थितीत..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात रंगय्यापल्ली येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १ मध्ये शौचालयाच्या अत्यंत खराब स्थितीबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर प्रशासन अखेर सक्रिय झाले आहे. बालकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पंचायत समिती सिरोंचा यांनी ९ मार्च २०२६ रोजी चौकशी समिती स्थापन केली होती. त्यानुसार १७ मार्च रोजी अधिकाऱ्यांनी अंगणवाडीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

प्राथमिक तपासात काही ठिकाणी दुर्लक्ष झाल्याचे संकेत मिळाले असले, तरी अंतिम निर्णय चौकशी अहवालानंतरच होणार आहे. दरम्यान, ग्रामस्थांकडून मुलांसाठी स्वच्छ व सुरक्षित सुविधा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.