ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️येणाऱ्या काळात सिरोंचा तालुक्यात भारतीय कम्युनिष्ट पक्षाचं बळ वाढविण्यासाठी सीमावर्ती नेतृत्व एकत्र : भव्य संमेलनाचा निर्णय..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिजापूर जिल्हा सचिव कॉ. कमलेश झाडी, कॉ सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव गडचिरोली व इतर तालुका कौन्सिल सदस्य यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सिरोंचा तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांवर लाल झेंड्याखाली ठोस काम उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या सीमावर्ती भागातील पक्ष नेतृत्व एकत्र आणून संघटन अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आला. या एकत्रित प्रयत्नातून सीमाभागातील आदिवासी,दलित,शोषित, वंचित आणि सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी लाल झेंड्याशिवाय पर्याय नाही,” असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
येत्या काळात सिरोंचा तालुक्यातील जवळील तेलंगणाचा प्रसिद्ध देवस्थान कलेश्वरसारख्या ठिकाणी भव्य जनसंमेलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संमेलनात सिरोंचा तालुक्यातील सर्व पक्ष सदस्यांसोबतच विविध जनसंघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तसेच छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील मद्देड, भोपालपट्टणम आणि तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील चेन्नूर मंडळ येथील कार्यकर्त्यांचाही यात सहभाग असणार आहे. त्यामुळे या संमेलनातून सिरोंचा तालुक्यात पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असे चित्र दिसत आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात भाकपा जिल्हा कौन्सिलच्या वतीने सिरोंचा तालुक्यात ५ दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याचे नेतृत्व कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केले. या दौऱ्यात विविध गावांमध्ये भेटी देत स्थानिक प्रश्न जाणून घेण्यात आले अनेक सोडवले सुद्धा तसेच तालुका सचिव कॉ. रवी बारसांगडी हेही सातत्याने शोषित आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
या सर्व घडामोडींमुळे सिरोंचा तालुक्यात भाकपाचे संघटन नव्या उर्जेने उभे राहत असून, येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नांवर अधिक व्यापक आणि आक्रमक लढा उभारला जाईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे यामुळे येणाऱ्या काळात लाल झेंडा आणखी मजबूत होईल सिरोंचा तालुक्यात असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.