▪️जुन्या कुर्माघरांना पर्याय ठरणार नवीन मावा आस्काना लोण..
▪️आयोगाच्या उपाध्यक्षांकडुन पाहणी..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : ग्रामीण भागात आदिवासी समाजातील महिलांना मासिक पाळीच्या काळात ज्या कुर्माघरा त राहावे लागते ती घरे अडगळीत अस्वच्छ आणि आवश्यक सुविधांअभावी असुरक्षित ठरत आहेत त्याला पर्याय म्हणून सीताटोला यागावात श्रमदानातून उभारलेले मावा आस्काना लोण (आपल्य हक्काचे घर) आदर्श ठरत आहे अनुसूचित जाती – जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी संबंधित अधिकान्यांसोबत काल सोमवारी त्याची पाहाणी केली आरोग्य व सुरक्षिततेसाठी सकारात्मक संकल्पनांना शासनस्तरावर पाठबळ देण्याचे सुतोवाच त्यानी केले त्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाकडुन विस्तृत आढावा घेतला जाणार आहे
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाति – जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम सोमवारी गडचिरोलीच्या दौन्यावर आले असताना त्यांनी धानोरा तालुक्यातील सीताटोला या गावलाभेट दिली तेथीलजुने कुर्मा घर तसेच स्पर्श या समाजसेवी संस्थेने कुर्माघराला पर्याय म्हणून तयार केलेल्या नवीन मावा आस्काना लोण या संकल्पनेतून उभारलेल्या घराची पाहणी केली स्थानिक महिलांनी स्वत: श्रमदान करून ही घरे उभाली असून स्पर्श संस्थेने त्यांना आवश्यक सहकार्य केले आहे या उपक्रमाचे? ड,मेश्राम यांनी कौतुक केले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ ,सचिन मडावी स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ दिलीप बारसागडे तसेच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या



