आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गॅस सिलेंडर टंचाईवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक : मूल तहसीलदार मार्फत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : राज्यासह देशभरात गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रभर जनतेच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत.
मूल शहर-तालुका पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ६ एप्रिल रोजी मूल तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून गॅस सिलेंडरची कृत्रिम अथवा नैसर्गिक टंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान, प्रशासनाकडून टंचाई नसल्याचे सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात ग्राहकांना लांब रांगा लावाव्या लागत असल्याचा विरोधाभासही यावेळी अधोरेखित करण्यात आला.
या वेळी श्री. बांबोळे सर, ऍड. रितेश मारकवार, मानकर सर, सहदेव रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा पुढील काळात तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.