◼️वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बाळू राऊत यांच्या कुटूंबियाची आपचे जेष्ठ नेते सावसाकडे यानी घेतली भेट
▪️प्रशासनाकडून आर्थिक मदतीसाठी प्रयन्त करण्याचे आश्वासन!

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙂 इंडिया २४ न्युज
गडचिरोली तालुक्यातील वसा चक – २ येथील ४५ वर्षीय बाळू विठ्ठल राऊत यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर आपचे जेष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वन केले.
बाळू राऊत हे भूमीहीन असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदारनिर्वाह करीत होते. शेतात गेले असताना वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वनविभाग तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
राऊत कुटुंबीयांची भेट घेऊन सावसाकडे यांनी त्यांच्या दुःखात सहभागी होत धिर दिला. तसेच प्रशासनाकडून कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील अशी आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी मृतकाची पत्नी सपना राऊत, वडील विठ्ठल राऊत, आई कमलाबाई राऊत, मोठे भाऊ संजय राऊत, सासरे संजय बोडेले तसेच मृतकाच्या दोन मुली उपस्थित होत्या.



