आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

चंद्रपूर पोलिसांची तत्परता आणि सतर्कताः एका तरुणाला आत्महत्येपासून वाचवले, अवघ्या 10 मिनिटांत शोध घेऊन वाचवला जीव..!

पोलीस स्टेशन सावली, भद्रावती आणि सायबर ची कामगिरी..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा पोलिसांच्या अत्यंत तत्पर, सतर्क आणि गतिमान कामगिरीमुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर सेल आणि स्थानिक पोलिसांच्या चोख समन्वयामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला वेळीच ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन करण्यात आले व त्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

दिनांक 28/06/2026 रोजी पोलीस स्टेशन सावली हद्दीतून एक 32 वर्षीय तरुण बेपत्ता (मिसिंग) झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान, सदर तरुणाने सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास हातामध्ये रासायनिक द्रव्याची (विषारी औषध) बाटली घेऊन आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल केला. “मी आत्महत्या करत आहे,” असे सांगून त्याने कॉल कट केला. यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

घटनेचे गांभीर्य ओळखून सावली पोलिसांनी तातडीने चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर इसमाचे लोकेशन शोधले असता, तो भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती मिळताच भद्रावती पोलिसांना त्वरित सतर्क करण्यात आले. माहिती मिळाल्यापासून अवघ्या 10 मिनिटांच्या आत भद्रावती पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत तत्परतेने शोध मोहीम राबवून त्या तरुणाला शोधून काढले आणि सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सदर तरुणाचे योग्य समुपदेशन (Counselling) केले, ज्यामुळे त्याचे मनपरिवर्तन झाले. त्यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. चंद्रपूर पोलिसांच्या या देवदूतासारख्या कामगिरीमुळे आपल्या मुलाचा जीव वाचल्याने नातेवाईकांनी अत्यंत भावूक होत चंद्रपूर पोलिसांचे आभार मानले आहेत.

सदर कौतुकास्पद व जीवरक्षक कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सावली श्री प्रदीप पुल्लरवार यांचे नेतृत्तवात सपोनि श्री सचीन मुसळे, पोहवा संजय शुक्ला, पोअं धिरज पिदुरकर, धनंजय काळे पोस्टे सावली आणि सपोनि श्री विरेंद्र केदारे, श्री संजय मिश्रा, पोउपनि श्री संतोष केदार, पोहवा गोपाल आतकुलवार, पोअं योगेश घाटोळे, भारत पुसांडे, खुशाल, किरण मिस्त्री पो.स्टे. भद्रावती आणि सपोनि श्री बलराम झाडोकर, पोअं वैभव पत्तीवार सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.