आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

नवजात बालकाची विक्री करणाऱ्या माहिलांनवर निष्पक्ष पारदर्शक चौकशी करावी..

▪️पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दिले निवेदन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची मागणी..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांना निवेदन देण्यात आले
चंद्रपूर शहरात नवजात बालकाची विक्री करण्यात
आल्याची घटना अतिशय धक्कादायक असून या प्रकरणामुळे संपूर्ण चंद्रपूर शहर हदरले आहे.
नवजात बालक विक्री प्रकरणात भाजपच्या दोन. महिला असून कथित नवजात बालक विक्री प्रकरणा मागे कोणाचा मास्टर माईंड आहे व या नवजात बालकाची विक्री करणारे रॅकेट कोण चालवीतआहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधम ओमकार गेडाम यांच्यावर कठोर कार्यवाही करावी हे दोन्ही प्रकरण जलद गती न्यायालयात प्रविष्ट करावे
नवजात बालक विक्री प्रकरणाणाची निष्पक्ष पारदर्शक सखोल चौकशी करुन सर्व संबंधित आरोपीना शोधून कठोरात कठोर शिक्षा करावी जेणे करुन अश्या घटनांची पुनःरावृत्ती होऊ नये अश्या मागणी चे निवेदन पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांना दिले साहेबांनी आरोपीवर कठोर कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी निवेदन देतांना उपस्थित ओबीसी सेल शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की, कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष महेश काहीलकर, विध्यार्थी अध्यक्ष परब गिरडकर ,शहर सचिव किशोर शेडमाके ,सरस्वती गावंडे ,सुनंदा महाते ,कविता धकाते ,कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.