आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

श्री नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर

: भारदस्त आवाज, करारी व्यक्तिमत्त्व, प्रभावी संवादफेक,व्यक्तिरेखा जिवंत करणारे प्रतिभावान कलावंत आणि तितकेच संवेदनशील व सामाजिक बांधिलकी जपणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर. मागील पाच दशकांहून मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपल नाणे खणखणीत वाजविणारे हे क्रांतिवीर. त्यांचे हे अचानक जाणं सर्वांना चटका लावून गेलं.अभिनया सोबत जपलेली सामाजिक बांधिलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळे पैलू होय.

अशी माणसे कधी मरत नसतात तर ती सदैव आपल्या सोबत असतात. विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे, नवी मुंबई रंगकर्मी व नाट्य रसिकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीहरी पवळे यांनी रांगोळीमधून काढलेले नानांचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या श्रद्धांजलीसाठी नवी मुंबईतील रंगकर्मी म्हणुन सुनील पगार , रंगराव घागरे , श्रीहरी पवळे ,गिरीश चावरे , दत्ता करे, मुकुंद महाले, रत्नकांत म्हात्रे, मदन मुकादम, विलास चव्हाण, रविन्द्र पाटील, जगदीश शेवाळे, रोशन मोरे, मिलिंद बनसोडे ,प्रशांत जोशी , शशी तुपे, रवी मोरे ,मिलिंद कांबळे, देवा सरकटे ही मंडळी उपस्थित होती. विष्णुदास भावे नाट्यगृह मधील कर्मचारी वर्ग तसेच संध्याकाळच्या प्रयोगासाठी आलेले रसिक प्रेक्षक उपस्थित होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. परत एकदा संपूर्ण महाराष्ट्रातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.