ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नागभीड येथे जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसींचे धरणे आंदोलन..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

नागभीड – सन २०२६ – २७ मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवून जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी नागभीड अखिल भारतीय ओबीसी संघटनेच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात मंगळवारी करण्यात आली. याबाबत संघटनेने तहसीलदारांमार्फत पंतप्रधान व जनगणना आयुक्तांना निवेदन देण्यात आले.ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या निश्चित झाल्याशिवाय शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व, आरक्षण तसेच अर्थसंकल्पातील निधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा निश्चित करता येणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जनगणना प्रपत्रात ओबीसींचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली.केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. मात्र २२ जानेवारी २०२६  व १४ ऑगस्ट २०२६रोजी काढण्यात आलेल्या राजपत्रांमध्ये स्वतंत्र ओबीसी कॉलमचा स्पष्ट समावेश नसल्याचा दावा संघटनेने केला. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी स्वतंत्र कॉलमसह जनगणना करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान या धरणे आंदोलनास गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

या धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दिगांबर चौधरी, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, संघटनेचे उपाध्यक्ष शिवशंकर कोरे, सचिव श्रीपत मटाले, सिताराम बावणकर, पुरूषोत्तम बगमारे, दौलत समर्थ, विनाजी निकुरे, गजानन देशकर, हरिदास ठाकरे, अशोक समर्थ, डॅनियल देशमुख, राजू मोरांडे, प्रकाश चौधरी, नितीन हेमने, शुभम हेमने, सुधाकर राऊत, विष्णू मोहुर्ले, सौ. यामिनी निकोडे, सौ. गीता ठवरे, सौ. लता देशमुख, सौ. संगीता लडके, सौ. कुसुम चौधरी, सौ. प्रेमलता बाबनकर, सौ. रुंदा देशमुख, सौ. सुनिता डोईजड, सौ. उत्तरा कोरे, सौ. अलका बघमरे, सौ. मयुरी मोहुर्ले सह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.