आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अहेरी शहरात कावीळचा उदेक..!

▪️एकांत प्रभागात आढळले 48 रुग्ण..!

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचीरोली – ( इंडिया 24 न्युज ) : अहेरी येथील नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये का्वीळच्या रूग्णांची अचानक वाढ होत 48 प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाध्ये खळबळ उडाली असुन संपुणऀ‌‌ यंत्रणा तातडीने अॅक्शन मोडमध्ये गेली आहे तब्बल 12 विशेष आरोग्यं पथकांच्या‌‌ माध्यमातुन घराघरांत जाऊन रुग्ण श़ोधम़ोहीम तपासणी आणी जनजागृती सुरु करण्यात आली आहे
18 नोव्हेंबरपासुन काही मुलांची प्रकृती बिघडु लागल्याने पालकांनी खाजगी आणि शासकीय‌ रूग्णालयात उपचार सुरू केले तिन चार रूग्णावर उपचार सुरू असतानाच पुंढील काही दिवसांत ही संख्या झपाट्याने वाढत 48 वर पोहोचली आरोग्य विभागाला परिस्थितीची माहिती मिळेपर्यत प्रभागात संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले
27 नोव्हेंबर रोजी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पंकज हेमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेड़े आणि डॉ. विशाल येरावार यांनी परिसरात भेट देऊन प्राथमिक तपासणी केली तब्बल 40 संशयित रुग्णांचे रक्तनमुने घेऊन प्रयोगशाला पाठविण्यात आले त्यानंतर 12 पथकांच्या साहाय्याने सर्व घरांची दवाखाना पातळीवरील तपासणी, लक्षणांची चौकशी आणि स्वच्छतेविषयी मार्गदर्शनाची मोहीम सुरू करण्यात आली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेड़े यांनी सांगितले की, माहिती मिळताच आम्ही तातडीने पथकांसह प्रत्यक्ष भेटी सुरू केल्या आहेत संशयित रुग्णांचे नमुने घेतले जात आहेत उपचार सुरू असून संर्पूण यंत्रणा सर्तक आहे नगरपंचायत व जीवन प्राधिकरण विभखगाला आवश्यक निर्देश दले आहेत विद्यार्थियाचीही आरोग्य तपासणी केली जानार आहे.
डॉक्टरांकडून सूचना मिळताच नगरपंचायत प्रशासनाचे शुक्रवारी नाल्या साफ करण्याचे काम सुरु केले, तसेच टंकरद्वारे तात्पुरता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढविल्याचे आळवले
जिवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा पाइपलाइनमध्ये काही ठिकानी लिकेज असल्यामुळे दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची शक्याता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे यानुसार संबंधित विभागाने तायडीने खोदकाम आणि दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केले आहे पिण्याच्या पाण्यातील प्रदुषणामुळेच कावीळचा संसर्ग पसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून, या प्रभागातील पाणीव्यवस्था नेहमीच ढासळलेली असल्याचा नागरिकांचा रोष वाढत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.