आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू मूल तालुक्यातील उश्राळा येथील घटना..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या इसमाचा पाय घसरून उमा नदीत बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ० २) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मूल तालुक्यातील उश्राळा गावाजवळील उमा नदी पात्रात घडली. हरीशचंद्र जोगळू कोरडे (४०, रा. उश्राळा) असे मृतकाचे नाव आहे.उश्राळा येथील मृतक दिवाकर देऊ म्हशाखेत्री यांच्या अंत्यसंस्कारासाठी हरीशचंद्र कोरडे हा गावकऱ्यांसोबत उमा नदीकडे गेला होता. अंत्यसंस्कारा दरम्यान नदी पात्रात उतरल्यानंतर चिखलात पाय घसरल्याने खोल डोहात बुडाला. आरडाओरड केल्यानंतर काही व्यक्ती धावून आले. मात्र, तो खोल पाण्यात वाहून गेला. पोलिसांना कळविल्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. पण अंधार पडल्याने पोलिस पथक परत गेले. शुक्रवारी (दि. ३) सकाळी पोलिस, नातेवाईक व ग्रामस्थांनी शोध घेतला असता आठ वाजता हरिश्चंद्रचा मृतदेह उमा नदी पात्रात आढळून आला. या घटनेने उश्राळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.