आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सोमनाथ प्रकल्प महिलेला ठार केलेल्या वाघाला अखेर वनविभागाने केले जेरबंद..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल वनपरिक्षेत्रातील मारोडा उपक्षेत्रा अंतर्गत सोमनाथ प्रकल्प येथे मानव जिवितास धोकादायक ठरलेल्या मादी वाघ टी – २२६ या वाघाला रात्री ७ वाजताच्या दरम्यन जेरंबद करण्यात आले.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, बफर चंद्रपुर मुल वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र मारोडा नियतक्षेत्र – मारोडा – २, सोमनाथ प्रकल्पातील शेत सव्हें क्रं. २ मध्ये वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी टीएटीआर चंद्रपुर, आरटीआर मिळुन मादी वाघ टी- २२६ या मादीला जेरंबद करण्यात आले.सदर मादी बाघ टी- २२६- एफ-एस१-एफ सबऑडीट चा घटनास्थळी पंचनामा करून प्राथमिक उपचार केंद्र चंद्रपुर येथे हलविण्यात आलेले आहे. घटनास्थळ उपस्थित कर्मचारी एस. यु. वाठोरे, सहायक वनसंरक्षक, आर. डि. शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी मुल, डॉ.खोब्रागडेरविकांत पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांचे आआरटी टिम, अजय मराठे पोलिस कॉन्स्टेबल, आर. सी. पेदापल्लीवार क्षेत्र सहायक मारोडा,आर. सी. धुडसे क्षेत्र सहायक मुल, ओ. एस. थेरे क्षे. सहा. जानाळा, बि. जे. बड़े वनरक्षक, मसराम वनरक्षक, पांढरे वनरक्षक, दुधे वनरक्षक, खोब्रागडे वनरक्षक, बुरांडे वनरक्षक, चनकापुरे वनरक्षक, जंगठे वनरक्षक, कुळमेथे वनरक्षक, करकाडे वनरक्षक तसेच एसपीटीएफ मुल टिम मिळुन मादी बाघ टी-२२६ – एफ एस १ – एफ सबऑडीट ला जेरबंद करण्यासाठी सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. असे (आर. डि. शेंडे) वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे. ) यांनी कळविले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.