ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
कोणसरी येथील रॉयल्ड मेटल कंपनीची उघडी दादागीरी..!! कोणतीही पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांच्या जमीनीचे सपाटीकरण !!
▪️शेतकऱ्यांना भुमीहीन करण्यासाठी देत आहे धमकी !!शासकीय संगनमताने शेतकऱ्यांचा मानसीक छळ.. !!

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात कोणसरी येथे लॉयल्ड मेटल अँड एनर्जी कंपनी असुन शेतकऱ्यांच्या जमीनी बळजबरी व धमकी देउन कोणतीही पुर्वसुचना न देता भुमीहीन करण्याचा तगादा लावत आहे, एकीकडे शासन म्हणतो का

कोणत्याही शेतकऱ्यांला भुमीहीन करता येत नाही आणि दुसरीकडे दमदाटी, मुजोरी, प्रशासकीय दबाव आणुन पिढ्यानपिढ्या शेती करुन आपली उपजीविका व उदरर्निरवाह चालवणा-या गोरगरीब शेतक-यांचा “वाली ” कोण ? शासन प्रशासनच जर शेतकऱ्यांच्या जिवावर उठला असा सवाल कोणसरी येथील शेतकऱ्यांचा असुन हे कुठतरी थांबले पाहीजे अन्यथा सामुहीक आंदोलन करण्यात येईल.



