ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️5 व्या राज्यस्तरीय पॅरा-ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये रोशन परशुरामकर यांना “गोळाफेक” मध्ये सुवर्णपदक..!

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 4 डिसेंबर 2025: शारीरिक मर्यादांवर जिद्दीने मात करून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या खेळाडूंसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या 5 व्या राज्यस्तरीय पॅरा-ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत, महावितरणच्या आर्वी विभागातील कनिष्ठ लेख सहाय्यक रोशन अशोक परशुरामकर यांनी सुवर्णपदक पटकावून विभाग आणि नागपूर परिमंडलासह महावितरणचे नाव उंचावले आहे.

भारत सरकारशी संलग्नित ‘पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया’ द्वारे कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण स्पर्धेत, रोशन परशुरामकर यांनी “गोळा फेक” या क्रीडा प्रकारात पहिला क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने क्रीडा क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

रोशन परशुरामकर यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल महावितरणमध्ये उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.त्यांच्या या कर्तृत्वासाठी महावितरण, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोदके, वर्धा मंडलच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, आर्वी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. आर्वी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने रोशन परशुरामकर यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यालयीन कामांसोबतच खेळाच्या माध्यमातून त्यांनी मिळवलेले यश हे खरंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे महावितरण परिवाराची मान अभिमानाने उंचावली असल्याचे मत प्रशांत गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. शारीरिक मर्यादा असूनही जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या रोशन परशुरामकर यांचे हे यश अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरणारे असल्याचे साम्गून मुख्य अभियंता त्यांनी रोशन परशुरामकर यांचे अभिनंदन केले आहे.

फोटो ओळ: 5 व्या राज्यस्तरीय पॅरा-ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणा-या रोशन अशोक परशुरामकर यांचे अभिनंदन करतांना आर्वी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड आणि त्यांचे सहकारी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.