आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपुरमध्ये ड्रग्ज माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी करवाई..!!

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी LCB स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करत दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून MD Drugs एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज पावडर तसेच मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹2,00,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभाग चंद्रपूर पथक पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीप्रमाणे आरोपी प्रांजल राकेश तिवारी (वय २४, रा. म्हाडा कॉलनी) व अदनान जाकीर शेख (वय २४, रा. ऑटो कॉलनी) हे मोटारसायकलने नागपूर रोडवरील धाब्याजवळ येणार असल्याचे समजताच पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचला.
तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून १३.५० ग्रॅम एमडी (MEPHEDRONE) सदृश पांढऱ्या रंगाची पावडर, मोटारसायकल, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, पोअ: किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता आदींनी केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.