आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांची आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार दिल्ली येथे बैठक..

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*

मूल – (इंडिया २४ न्यूज ) :आज नवी दिल्ली येथे मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी मंत्री यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग विकास मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते आणि पूल संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली.

यामध्ये मूल ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या खराब स्थितीची माहिती देत, त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची विनंती केली. चंद्रपूर- मुल राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रिट करण्यासाठी निवेदन दिले. सोबतच मुल शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी बायपास रोड करण्यात यावे.मूल ते चंद्रपूर महामार्गावरील सुमारे ३० वर्षांपासून जुन्या पुलाला पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ सिमेंट काँक्रिटने भरावेत, ही मागणी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मा. नितिनजी गडकरी यांचेकडे केली.
या सर्व विषयांवर मा. गडकरीजींनी सहानुभूतीपूर्वक विचार करत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासनही दिले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.