आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्राईम

▪️जनसामान्यांना न्याय देण्यासाठी भाजपा सदैव कटिबद्ध : आमदार देवराव भोंगळे

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

खैरगांव : ( इंडिया 24 न्युज ) : येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

कोरपना: भाजप हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. आमचे कार्य हे विकास आणि जनसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठीच केंद्रित आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात देशात व राज्यात विकासाच्या मोठ्या योजना राबवण्यात येत आहेत. जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय देऊन ग्रामीण भागात विकासाचा झंझावात पोहचविण्यासाठी भाजपा सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना तालुक्यातील खैरगांव येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.

पुढे आमदार भोंगळे म्हणाले, खैरगांव येथे झालेला पक्षप्रवेश हा भाजपच्या वाढत्या जनाधाराचे उदाहरण आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या सहकार्यातून आपण आगामी काळात अधिक भक्कमपणे कार्य करून ग्रामीण भागात विकासाचा रथ अधिकच पुढे नेण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये संदीप बेरड , राहुल डाखरे , राकेश ठावरी, महेश वरारकर, विलास निमकर, अरविंद मोरे, हितेश राजुरकर ,उमेश निमकर ,संजय बावणे , बालाजी मडावी, वासुदेव निमकर, मनोज बेरड ,गणेश ढासले, पवन गुरनूले, गजानन पोटे ,चरणदास पोटे , प्रवीण उरमाले ,आकाश गुरनूले, दिनकर भलमे, विनोद कोटनाके, आनंदराव बावणे, राजू बोबडे, वामन राजूरकर ,सतीश ठावरे ,धनराज तावरे, रमेश कुळसंगे, देविदास कुसराम, कविता बेरड, अनिता बेरड ,श्वेता वरारकर , जीवनकला ठावरे किरण वरारकर, गीता ठावरे, रीना ठावरे, अश्विनी उलमाले, मीना उरमाले, गिरजा ढासले, हर्षाली निमकर, प्रेमीला निमकर, टीना राजुरकर , रेखा राजूरकर , यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी भाजपा कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, अर्चना भोंगळे, राजुरा शहर महामंत्री सचिन भोयर, अरुण मडावी,प्रमोद कोडापे, विनोद चौधरी,पवन बुरेवार, भाऊराव ठावरी,,दिनेश खडसे, नितिन वांढरे,गोवर्धन मडावी, नागोराव मरापे, वासुदेव निमकर, विनायक बेरड, सुभाष राजुरकर, दिनेश ढेंगळे, उमेश पालीवार यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.