आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 2 : केंद्र शासनाच्या रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसपीआर) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाद्वारे 23 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांवर देखील एचएसपीआर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

एचएसपीआर बसविण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर दि. 1 जुलै 2026 पासून जुन्या वाहनांवर एचएसपीआर बसविण्याच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्या वाहनांवर सदर नोंदणी प्लेट बसविण्यात येणार नाही, अशा सर्व वाहनांवर केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील नियम 50 तसेच मोठे वाहन अधिनियमातील कलम 177 नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या वाहन धारकांनी एचएसपीआर बसविण्यासाठी आगाऊ नोंदणी घेतली आहे, अशा वाहनांना अंमलबजावणीपासून सूट देण्यात येईल.

सर्व वाहन चालक / मालक व सर्व नागरिकांनी आपले ताब्यातील वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्याची कारवाई करावी. अन्यथा प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर व वाहतूक पोलीस विभागाद्वारे मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.