आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

घुग्गुस येथील पीएम श्री जि. प. उ. प्राथ. शाळेत प्रवेशोत्सव..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 2 : पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा घुग्गस येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने प्रवेशोत्सव, शाळा पूर्वतयारी मेळावा तथा नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजन झाल्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन, स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित शाळा पूर्वतयारी मेळाव्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक साहित्य, कृती आधारित उपक्रम, खेळातून शिक्षण, भाषा व गणित विकास उपक्रम आणि पालकांसाठी मार्गदर्शन यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पालकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेच्या नाविन्यपूर्ण कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाला घुग्गुसच्या नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, उपाध्यक्ष राजू रेड्डी, बालकल्याण समितीच्या सभापती माला मेश्राम, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनू कामतवार, केंद्रप्रमुख श्री. पायपरे, तसेच पालकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व विशद केले आणि प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी पालकांनी नियमित शाळेशी संपर्क ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन केले. पीएम श्री योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या आधुनिक, कौशल्याधारित व आनंददायी शिक्षणाची माहितीही यावेळी देण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.