आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

जिल्हा माहिती कार्यालयाकडून वृत्तपत्रीय..

▪️रद्दी व जुने टायर विक्रीसाठी दरपत्रके आमंत्रित..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 1 : जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर येथील अ, ब व क वर्गातील दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांची रद्दी तसेच शासकीय वाहन क्रमांक MH-43 G-0427 मधील वापरात नसलेले चार जुने टायर विक्रीसाठी इच्छुक स्थानिक रद्दी खरेदीदार, व्यापारी व संस्थांकडून सीलबंद दरपत्रके (निविदा) मागविण्यात आली आहेत.

इच्छुकांनी कार्यालयातील वृत्तपत्रीय रद्दी व जुने टायर यांची कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष पाहणी करून आपले दरपत्रक दि. 07 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, रूम क्र. 20, पहिला मजला, प्रशासकीय भवन, चंद्रपूर यांच्या नावे सीलबंद पाकिटात सादर करावे. पाकिटावर “वृत्तपत्रीय रद्दी व जुने टायर विक्रीसाठी दरपत्रक” असे ठळक अक्षरात नमूद करणे आवश्यक आहे.

प्राप्त झालेली दरपत्रके त्याच दिवशी दुपारी 3 वाजता उघडण्यात येणार असून इच्छुक निविदादार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. वृत्तपत्रीय रद्दी व जुने टायर यांची पाहणी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रूम क्र. 20, पहिला मजला, प्रशासकीय भवन, चंद्रपूर येथे करता येणार आहे.

दरपत्रके स्वीकारणे, नामंजूर करणे अथवा कोणतीही निविदा रद्द करण्याचे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर यांनी राखून ठेवले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.