इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन तर्फे जेष्ठ समाजसेविका,पत्रकार हेमाताई रसाळ यांचा सन्मान !

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
परभणी – ( इंडिया 24 न्युज ) : येथील जेष्ठ समाजसेविका, विशेषत: महिलांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी सदैव कार्यरत राहुन ,महिलांच्या चळवळीतील सहभागाबरोबरच ,सामाजिक व पत्रकारीतेच्या क्षेत्रातही केलेल्या उल्लेखनीय कार्याने सर्वत्र लोकप्रिय ,वृत्तपत्रसृष्टीतील आदर्श व्यक्तिमत्व,दै.गोदातीर समाचार ( मुख्य आवृत्ती)च्या माजी कार्यकारी संपादिका, जेष्ठ पत्रकार श्रीमती हेमाताई रवींद्र रसाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार मदन बापु कोल्हे यांनी श्रीमती हेमाताई रसाळ यांना बुके देऊन त्यांचा सत्कार करुन सम्मानित केले.
दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी परभणी येथील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरामध्ये असलेल्या श्रीमती हेमावती रसाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे महाराष्ट्र मिडीया चिफ देवानंद शंकरराव वाकळे यांनी बुके तर कार्याध्यक्ष दि.फ. लोंढे गुरुजी यांनी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांचे जीवनावरील पुस्तक रसाळताईंना भेट देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ‘ इरा ‘ चे प्रवक्ता मनोहर मोपकर यांचेसह परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण कुलकर्णी मानोलीकर, जिल्हा संघटक लक्ष्मीकांत बनसोडे,पत्रकार मोरे सर ,दै.गोदातीर समाचार परिवारातील सदस्य शकील खान आदींची यावेळी उपस्थिती लाभली होती,
तसेच यावेळी स्थानिक महिला मंडळांच्या वतीनेही श्रीमती हेमाताई रसाळ यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. महिला उन्नती संस्थेच्या प्रदेश कार्याध्यक्षा सौ. आशाताई कोल्हे,श्रीमती जयमाला वाघमारे, मीनाताई घनसावत यांनी पुष्पहार घालून हेमाताईंचा सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



