▪️ऋतिक गोयल मूल नगरपरिषद निवडणूक रिंगणात..
▪️सामान्य जनतेची सेवा आणि शहराचा विकास हेच ध्येय..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : होऊ घातलेल्या मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्व सामान्य जनतेची सेवा व त्यांचे काम करणे हेच माझे ध्येय मनात ठेऊन मूल शहरातील तरुण, सुशिक्षित आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून ऋतिक दिनेश गोयल यांनी मूल नगर परिषदेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. गोयल कुटुंबाची ओळखच सामाजिक कार्य, संस्कार आणि सर्वांसाठी उपलब्ध राहण्याच्या वृत्तीने भरलेली आहे. एकत्र संयुक्त कुटुंब व्यवस्था असल्याने लहानपणापासूनच ऋतिक यांच्या मनात समाजाभिमुखतेची बीजे रोवली गेली आहेत.
ऋतिक गोयल हे जेसिज या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेशी जुळलेले असल्याने त्यांना समाजातील प्रत्येक स्तरातील समस्यांचा जवळून परिचय झाला आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा समजून घेऊन त्यावर नवे समाधान शोधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.
ज्या प्रभागामध्ये राहील त्या प्रभागातील नागरिकांना “नेहमी उपलब्ध राहणे” त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांचा स्पष्ट प्रण आहे. प्रत्येक व्यक्तीची समस्या ऐकून तात्काळ उपाययोजना करणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
निवडणुकीत संधी मिळाल्यास प्रभागाला ‘स्मार्ट वॉर्ड’ बनविणे, नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित मुल घडवणे,युवकांसाठी दिशा, महिलांसाठी सुविधा आणि ज्येष्ठांसाठी सुरक्षित आरोग्याच्या दृष्टीने पोषक असे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असून जनसामान्यांची सेवा हेच त्यांचे कर्म राहील, असेही ते म्हणाले.ते स्मितभाषी, शांत स्वभावाचे, मायाळू असून त्यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.



